माझी शाळा
जुन्या आठवणीत रमता रमता
माझी शाळा अजुनही पुन्हा पुन्हा आठवते
डोळ्यातील आसवांवाटे परत ती पाझरते.
शाळेचा तो पहिला दिवस आठवणीतुन काही जात नाहीत.
बाईंचे ते प्रेमळ शब्द आता काही ऐकु येत नाहीत.
ईवल्याश्या पिटुकल्याला शाळेत सोडणारे ते आई वडिलांचे आनंदी चेहरे.
ऐकटे अनोळखी ठी़काणी रहावे लागणार
म्हणुन आईशी बिलगुन रडणार्या त्या पिटुकल्याचे ते निरागस डोळे.
तिथेच भेटलेल्या मित्रांचा प्रेमळ सहवास....
मस्ती केली तर मिळणार्या गुरुजींच्या माराचा धाक.
मित्रांच्या नकळत खाल्लेले त्यांचे डबे.
अभ्यास केला नाही म्हणुन परिक्षेत काय लिहावे?
ह्याचे दणाणलेले धाबे.
गुरुजींची नक्कल केली म्हणुन झालेली शिक्षा.
नेहमीच दुसर्यांना मदत करावी ही मिळालेली दिक्षा.
शाळेचा व मित्रांचा निरोप घेताना आलेले रडु
पाठीवर प्रेमळ हात फिरवत मित्रांचे ते सांगणे
"आपण परत परत भेटणार , असा रडु नकोस रे जाडु."
शाळा सोडताना हेलावलेल मन ,जडावलेले पाय,
क्षिक्षकांशी असलेल आपुल़कीच अतुट नात
मनात अजुनही जिवंत आहे.
शाळा आता नसली तरी,
माझ मन अजुनही व्यापुन आहे.
शाळा आता नसली तरी,
माझ मन अजुनही व्यापुन आहे.
माझी शाळा
ReplyDeletehi aaplya school chi kavita
ReplyDeletehe pan mazi aavdati school ahe..........
ReplyDeletehona hi aapli school aahe ....................................
ReplyDelete